Visit CCMB's Official Website

कोरोना : भारतात सांडपाण्यातही सापडला कोरोना व्हायरस?

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये सांडपाण्यात कोरोनाचा व्हायरसचे नमुने आढळले आहेत. हैदराबाद इथल्या ‘सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजी’नं (CCMB) हा दावा केला आहे.

व्हायरसचे सापडलेले नमुने संसर्गजन्य नसल्याचंही CCMBनं म्हटलं आहे.

एखाद्या भागातील सांडपाण्याचा नीट अभ्यास केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो की नाही याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, असंही CCMBनं म्हटलं आहे.

बीबीसीनं CCMB चे निर्देशक राकेश मिश्रा यांच्याशी कोरोना व्हायरसचे वेगवेगळे प्रकार, कोरोनाची लस आणि कोरोनाच्या संसर्गाची क्षमता याविषयीच्या मुद्द्यावर चर्चा केली.

हे सर्वेक्षण कशासाठी?

CCMB नं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, कोरोना व्हायरसचे नमुने हैदराबादमधील सांडपाण्यात आढळले आहेत. पण, CCMBनं हे सर्वेक्षण कशासाठी केलं?

Read more at: https://www.bbc.com/marathi/india-53874090